BY : मच्छिन्द्र टिंगरे –
बारामती मध्ये गेल्या चार वर्षांमध्ये खून खंडणी अपहरण अशा प्रकारचे गुन्हे दडपले जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अन्याय, अत्याचार याला न्याय देणारे महाराष्ट्राचे पोलीस आता गुन्हेगारांच्या पाठीशी उभा राहिलेत असं म्हटलं तर नवल वाटायला नको. कारण गेल्या आठवड्यात बारामती मध्ये सीसीटीव्ही मध्ये एका डॉक्टरचा खंडणीसाठी अपहरण झालं तरी देखील पोलीस त्यामध्ये गुन्हा दाखल करत नाहीत. माळेगावच्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कस्टडीत असताना डॉक्टरने अनेक नागरिकांना त्याचे अपहरण झाले ते सांगितले तपास अधिकारी भांगे यांनी ते रेकॉर्डवर का घेतले नाही. या अपहरण प्रकरणात पोलिसांपासून अनेक आरोपींचा सहभाग असल्यामुळे पोलीस या गुन्ह्यातील आरोपींना वाचवत आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणाकोणाच्या “परड्या भरल्या” याची चर्चा बारामतीत रंगली आहे.
तीन वर्षांपूर्वी बारामती शहरातील कसब्यात एका महिलेचा खून झाला होता. तो खून तब्बल दोन महिन्यानंतर उघडकीस आला. त्यानंतर आता खंडणीसाठी एका डॉक्टरचे नियोजित कट करून अपहरण करण्यात आले. खंडणीसाठी त्याला तीन जिल्ह्यात फिरवले. विशेष म्हणजे हा गुन्हा सीसीटीव्ही मध्ये झाला असला असून सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या गुन्ह्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैवाची बाब आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भांगे यांच्याजवळ डॉक्टरने त्यांचे अपहरण झाल्याची कबुली दिली होती. मात्र भांगे यांनीच आरोपी डॉक्टर शिंदेला गुन्हा दाखल करू नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल अशा प्रकारची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधित तपास अधिकाऱ्याला ही आरोपी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
पवार कुटुंबाकडून झोपेचं सोंग
बारामती पोलिसांच्या या कारभाराला आता नागरिक वैतागले असून याबाबत आता मोठ्या प्रमाणावर आवाज उठण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आता बारामती मध्ये तब्बल तीन खासदार आणि दोन आमदार असताना देखील पवार कुटुंबाने मात्र या प्रकरणात झोपेच सोंग घेतल आहे. कडक शिस्तीचे आणि शिस्तप्रिय उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र त्यांनी देखील या गुन्ह्यामध्ये कानावरती हात ठेवले आहेत. सराईत गुन्हेगारांनी केलेला एवढा मोठा गुन्हा बारामती मध्ये जर दडपला जात असेल तर गोरगरिबांबाबत काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवणार आहेत.
आमच्या इकडे सर्व प्रकारचे गुन्हे दडपले जातील अशीच पाटी पोलीस स्टेशनवर लावण्याची वेळ बारामतीतल्या पोलीस ठाण्यांवरती आले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अशी चर्चा बारामती मध्ये रंगत आहे.