BY :मच्छिन्द्र टिंगरे
भिगवण येथील मास्याचे व्यापारी बाळासाहेब काळे यांच्या सुनेने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलीस अधिकारी ए पी आय महांगडे यांनी आरोपींना समोर येत आहे. याशिवाय मोकाट आरोपींना पोलिसांकडून अभय दिले जात आहे. असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात एपीआय महांगडे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी. विवाहितेच्या आईने आक्रमक पवित्रा घेतला असून डी वाय एस पी कार्यालयाच्या बाहेर आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भिगवण येथे बाळासाहेब काळे यांचा मुलगा ओंकार काळे गेल्या वर्षी झाला होता. काळे कुटुंबीयांचा सूनेवर संशय होता. फेसबुक इंस्टाग्राम वापरत असल्यामुळे तिचे अनैतिक संबंध असू शकतात या समजातून त्यांनी सुनेचा छळ केला होता. या छळाला कंटाळून त्यांच्या सुनेने घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. 15 जून रोजी आत्महत्या झाल्यानंतर आठवडा उलटून गेला तरी अद्यापही आरोपी पोलिसांना मिळत नाहीत. तपास अधिकारी महांगडे हे आरोपींना पाठीशी घालत असल्याची चर्चा होत आहे. यांनीच आरोपींना पळवून लावल्याचा आरोप देखील मुलीच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
आरोपींचे नेत्यांच्या दारात हेलपाटे.. नवविवाहितात आत्महत्या प्रकरणी आरोपी आणि त्याचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील एका महत्त्वाची आणि त्याच्या घरी जाऊन वाचवण्याची विनंती करून आले आहेत. आरोपी हे इंदापूर तालुक्यातच असून देखील पोलिसांना मात्र मिळत नाहीत यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे. वेळोवेळी पोलिसांना पाठपुरावा करून देखील आरोपी अटक होत नसल्यामुळे मयत नवविवाहितेच्या आईने आंदोलनाचे हत्यार उपसला आहे. दोन दिवसात आरोपींना मिळाल्यास मंगळवारपासून डीवायएसपी ऑफिसच्या बाहेर आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मयत मुलीच्या आईने दिला आहे. एपीआय महांगडे हे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी आता तरी लक्ष देतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे.