BY : मच्छिन्द्र टिंगरे – सध्या देशात पूजा खेडकर यांनी अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र प्रमाणपत्र देऊन थेट आय. ए. एस. ची पोस्ट मिळवली. त्यानंतर राज्यात व देशात एकचं खळबळ उडाली होती. त्यानंतर सगळीकडे एकचं चर्चा सुरु झाली. बोगस कागदपत्र देऊन नोकरी किती लोकांनी मिळवली. यात आता दौंड मधील एक प्रकरण समोर येत आहे. यात एका महिलेने बोगस जातीचा दाखला देऊन एका अनुदानित शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पदावर ती नोकरी मिळवली आहे. त्यामुळे पूजा खेडकर सारखे आणखी किती प्रकरणे ग्रामीण भागात उघड केस येणार हे देखील महत्त्वाचा आहे. दौंड तालुक्यात हे प्रकरण प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता दौंड तहसीलदार यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दौंड तालुक्यात काळेवाडी या ठिकाणी असलेल्या स्वर्गीय सुभाष कुल माध्यमिक विद्यालयांमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. जया निडोणी यांच्या जातीच्या दाखल्याची काही कागदपत्र समोर आली आहेत. निडोने यांनी दौंडच्या तहसील कार्यालयातून जातीचा दाखला काढला आहे. एसएससी शेड्युल कास्ट चे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांनी वंशावळ जोडली आहे. ही वंशावळ जोडताना त्यांनी 1950 चा पुरावा म्हणून आपल्या वडिलांचा दाखला जोडला आहे. हसनअप्पा कलप्पा नादुवेदमणी असं त्यांच्या वडिलांचे नाव असून शेठ ज्योती प्रसाद या विद्यालयांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले असल्याचा शाळेचा दाखला जोडला आहे.
मात्र जया निवडोनी यांनी जोडलेला पुरावा याबाबत विद्यालयातून मिळवलेल्या माहितीतून या नावाचा कोणताही विद्यार्थी शाळेत नव्हता किंवा त्यांनी जोडलेला शाळेचा दाखला यापैकी कोणतेही कागदपत्र या विद्यालयातून देण्यात आलेली नाहीत असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे 1950 च्या आधीचा जोडलेला शाळेचा दाखलाच अस्तित्वात नसेल तर हे जात प्रमाणपत्र खरे कशावरून असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे याबाबत आता दौंड चे प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.