BY : मच्छिन्द्र टिंगरे – विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी भेटीगाठी दौरा चालू केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांची काय भावना होती. पक्ष संघटना कुठे कमी पडली. याशिवाय विकास कामांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पार्थ पवार यांनी बारामतीचा दौरा आखला आहे. या दौऱ्यातील भाग म्हणून काल त्यांनी झारगडवाडी गावात भेट दिली. या भेटीमध्ये अनेक नागरिकांनी समोर येऊन आमची लोकसभेला आम्ही भावनिक होतो त्यामुळे चूक झाली. विधानसभेला असं होणार नाही असा सांगावा अजित दादांना द्या असा निरोप पार्थ पवार यांच्याकडे दिला. पार्थ पवारांच्या या गाव भेट दौऱ्यामध्ये या पंचक्रोशीमध्ये नागरिकांनी पार्थ पवार यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद दिला. विशेष करून या गाव भेट दौऱ्यांमध्ये तरुण आणि महिलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आले.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामती मध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हे सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. पार्थ पवार यांनी केलेल्या गाव भेट दौऱ्यामध्ये लोकांना अजित पवारांनी केलेल्या विकास कामांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. दादांनी आजपर्यंत बारामती तालुक्याचा केलेला विकास त्यांची काम करण्याची पद्धत समजावून सांगत असताना दादांचे नेमकं काय चुकलं असा भावनिक प्रश्न केला. यावेळेस तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसभेला आम्ही भावनिक होतो त्याच्यामुळे आमच्याकडून ही चूक झाली असं सांगितलं. आमच्याकडून दादांनी एवढी काम करून सुद्धा त्यांच्या वरती अन्याय झाला अशी कबुली दिली. झारगडवाडीतल्या राजवाडा श्रीराम नगर वैदु वस्ती आणि गणेश मंदिर परिसरात पार्थ पवार यांना भेटण्यासाठी तरुण आणि महिलांनी गर्दी केली होती. या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पार्थ पवार यांना महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

आम्ही लोकांसाठी उपलब्ध राहणार…. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत राज्यातील सर्व राजकीय प्रशासकीय व सामाजिक घडामोडींवरती त्यांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अजित दादांना आता त्यांच्या वेळेच्या नियोजनामध्ये प्रचंड ताना ताण होत आहे. बारामतीकर नागरिक हा दादांचा प्राण आहे. पूर्वीसारखा दादांना बारामतीकरांसाठी वेळ देता येत नाही. म्हणूनच मी जय आणि सुनेत्रा वहिनी बारामतीकर नागरिकांसाठी कायम उपलब्ध राहणार असल्याचं पार्थ पवार यांनी नागरिकांना सांगितले. यावेळी दौऱ्याच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी गावातील काही निष्ठावान कार्यकर्ते खेळाडू सामाजिक कार्यकर्ते व काही सांत्वन भेटी ही घेतल्या. संपूर्ण दौऱ्यामध्ये पार्थ पवार यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ही दिसून आले.
