BY : मच्छिन्द्र टिंगरे – बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील माजी उपसरपंच सोनाली करे यांचे पती रामभाऊ करे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सावकारांच्या त्रासाला कंटाळून व ग्रामपंचायतच्या कामाच्या कंत्राटामध्ये कमिशन व आर्थिक फसवणूक झाल्यामुळे रामभाऊ करे यांनी आत्महत्या केले असल्याची तक्रार तुमची पत्नी सोनाली करे यांनी दिली आहे. मात्र या कामांमध्ये फिर्यादीने नमूद केलेल्या आरोपींनीच लूट केली नसून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मोठं घबाड खाल्ल्याचे समोर येत आहे.
झारगडवाडी गावातील कचरे वस्तीवर उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराच्या सभा मंडपाचे काम ठेकेदार अविनाश तात्यासो खामगळ यांना काही कमिशन देऊन सब ठेकेदार म्हणून रामभाऊ करे यांना काही पुढार्यांनी काम दिले होते. हे काम करण्यासाठी ज्या पुढार्यांनी मध्यस्थी केली होती त्याच पुढार्यांनी भांडवल म्हणून रामभाऊ करे यांना व्याजाने पैसे दिल्याची तक्रार सोनाली करे यांनी दिली आहे. याशिवाय खामगळ यांना ठरलेल्या कमिशन पेक्षा दुप्पट कमिशन द्यावे लागल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याच कामाच्या अनुषंगाने रामभाऊ करे यांनी त्यांच्या नेहमीच्या डायरीमध्ये बऱ्याच नोंदी करून ठेवल्या आहेत. आता या नोंदीमध्ये रामभाऊ करे यांनी आजपर्यंत कोणाला किती पैसे व व्याज दिले आहे हे लिहून ठेवल आहे. त्यामुळे बांधकामाचे कंत्राट रामभाऊ करे यांच्या जीवावर उठले असल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांची तक्रार दादांच्या दरबारात जाणार दरम्यान या नोंदणी मध्ये दहा लाखाच्या कामांमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एक लाख रुपये कमिशन दिल्याचे नोंद दिसून येत आहे. त्यामुळे दहा लाखाच्या कामात जर एक लाख रुपये फक्त अधिकाऱ्यांचेच कमिशन असेल तर. मोठ्या कामांमध्ये किती भ्रष्टाचार होत असेल याचा अंदाज न केलेला बरा. रामभाऊ करे यांच्या आत्महत्या नंतर गाव गाड्यांमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालते हे समोर आले आहे. ग्रामपंचायतच्या कामात सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना कामे देऊन त्यांच्याकडून कमिशन व व्याज वसूल करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शासकीय दरबारात काम करत असलेले अधिकारीही कुठे कमी नाहीत. आता याचीच तक्रार घेऊन होलार समाजातील नागरिक व ग्रामस्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार असल्याची समाजातील नागरिकांनी दिली आहे. याशिवाय सदर बाबीची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करणार असल्याची ही माहिती समाजातील कार्यकर्त्यांनी दिली आहे.