बारामती प्रतिनिधी : बारामतीतं राहणाऱ्या एका तरुणीला पोलीस भरती साठी आलेल्या तरुणांने लग्नाचे आमिष दाखवत सात वर्ष लैंगिक अत्याचार केले. सात वर्षांपासून लग्नाचे वचन देऊन विश्वास संपादन करून फसवणूक केली म्हणून संबंधित तरुणीने आता अक्षय शिंदे राहणार सावरगाव ता. तुळजापूर जि धाराशिव याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावरगाव येथील अक्षय शिंदे हा 2017 मध्ये पोलीस भरती च्या ट्रेनिंग साठी बारामती येथील एका अकॅडेमी मध्ये आला होता. त्यावेळी तो राहत असलेल्या परिसरात शेजारी एक मुलगी राहत होती. त्या मुलीबरोबर अक्षय याने ओळख वाढवून मैत्री केली. नंतर तिच्याशी ओळख वाढल्यानंतर प्रेमं संबंध प्रस्थापित केले. 2017 पासून याने या मुलीशी लग्नाचे वचंन देऊन वारंवार भिगवण, बारामती, व राहत्या घरी लैंगिक शोषण केले असल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये केली आहे. तीच्या तक्रारीवरून बारामती पोलीस ठाण्यातं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा अक्षय शिंदे याचं मोहोळ तालुक्यातील आष्टी गावातील एका तरुणीबरोबर लग्न आहे. लग्नाच्या आधी एक दिवस अक्षय शिंदे भावाच्या मदतीने तक्रारदार मुलीच्या संपर्कात होता. सदर मुलीने गुन्हा दाखल करू नये म्हणून हे सर्वजण वारंवार संपर्क करत होते. मात्र मुलीने सलग सात वर्ष आपल्याला लग्नाचे वाचन देऊन आपली फसवणूक करून आपल्यावर अन्याय केला असल्याचे म्हटले आहे. बारामती तालुका पोलिसांनी लागलीच तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.