BY :मच्छिन्द्र टिंगरे– देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. या निकालामध्ये महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशाच्या जनतेने दिलेला कौल देशाची दिशा बदलणारा ठरला.महाराष्ट्रामध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण पक्ष फुटीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेला पटले नाही हेच या निकालातून दिसून आले. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळाले असून त्यांना मोठा कौल दिला आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी तब्बल 30 जागा या महाविकास आघाडीच्या पदरी पडल्या आहेत. तर अवघ्या 17 जागा मिळवण्यात महायुतीला यश आला आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने हद्दपार केल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत या 48 जागांचा निकाल काल लागला. त्यावेळेस देशातल्या सर्व एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषकांच्या अंदाज मोडीत निघाला. 48 पैकी काँग्रेसला 13 भाजपला 9 शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 9 राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघी 1 जागा मिळाली. सांगलीतील विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार निवडून आले. राज्यात महायुतीने आपकी बार 45 पार नारा दिला होता. तोच जनतेने सपशेल खोटा ठरवत अवघ्या 17 जागा महायुतीच्या पदरात पडल्या. तर सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत. महाविकास आघाडीला मात्र तब्बल 30 जागा मिळाल्या.
महाविकास आघाडीने प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये देशातली बेरोजगारी महागाई हे मुद्दे पुढे केले होते. त्याचबरोबर पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा तसंच देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा डाव आपला जात असल्याचे मुद्दे समोर आणले. त्याचबरोबर देशामध्ये हुकूमशाहीची राजवट चालू असेल लोकशाही मोडीत काढले जात असून संविधान संपवण्याचा डाव असल्याचा प्रचार महाराष्ट्र मध्ये करण्यात आला. महाराष्ट्रातल्या जनतेने महाविकास आधाडीच्या या प्रचाराला साथ देत महायुतीला विजयापासून दूर ठेवले.
महाराष्ट्रातील जनतेने पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती दाखवली आणि ही सहानभूतीचे रूपांतर मतपेटीत बंद झाल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. पक्ष फोडाफोडी चेक केलेले राजकारण भाजपच्या चांगल्या अंगलट आल्याचं निकालानंतर स्पष्ट झाला आहे. याचा सर्वाधिक फटका खुद्द भाजपलाच बसला. भाजपला अवघ्या नऊ जागांवर ती समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीवर देखील या निकालाचा मोठा परिणाम होऊ शकतो.