BY: मच्छिन्द्र टिंगरे – बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन ला कोणत्या देवाला नवस केल्यावर चांगले अधिकारी मिळतील हे आता तालुक्यातील नागरिकांना समजायला मार्ग नाही. बारामती तालुका पोलीस स्टेशन ची खुर्ची यात बदनाम होऊ लागली आहे. गेल्या चार वर्षातील आलेले अधिकारी. बहुदा कोणत्या ना कोणत्या कारणाने बदनामच होऊनच जातायत असं चित्र निर्माण झालं आहे. आता नवीनं आलेले साहेब हे यांचा आवाज तर आख्या पोलीस स्टेशन मध्ये घुमत आहे. मात्र पोलीस स्टेशन च्या उशाला चालू असलेले बेकायदा धंदे करणाऱ्या लोकांपर्यंत मात्र पोहचत नाहीत.
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांना चढ्या आवाजात वाघ असल्याच्या डरकाळ्या फोडणाऱ्या नव्या साहेबाच्या दमदाटीने तक्रारीसाठी आलेल्या लोकांना आपणच आरोपी असल्याचा फील येतोय. दुसरीकडे एम. आय. डी. सी.,तांदुळवाडी, आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेफाम बेकायदा अवैध धंदे चालू असताना त्याचा आवाज मात्र सायबाच्या कानावर जात नाहीं. अवैध धंद्यानी बारामती मध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. असं असताना साहेब स्वतःच्या धुंदीत मशगुल आहेत असं चित्र तालुका पोलीस ठाण्यातं दिसत आहेत.
बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याची अक्षरशः मंदियाळी भरली आहे. असं असताना तालुका पोलीस ठाण्याला गेल्या चार वर्षात पोलीस अधिकारी काय धड मिळेना झाला आहे. एक ना धड अन भाराभर चिंध्या अशी परिस्थिती आहे. आता बारामती तालुका पोलीस पोलीस स्टेशन च्या हद्दीतील बेकायदा धंदे बंद करण्यासाठी आता थेट एस. पी ना बोलवाव लागतंय का कीं काय? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.