BY :मच्छिन्द्र टिंगरे –बारामती तालुका पोलीस स्टेशन अनेक विषयांनी चर्चेत राहिलं आहे. गेल्या वर्षभरात अनेक घटनानांनी पोलीस स्टेशन चर्चेत आलं होतं. येथील काही पोलीस अधिकऱ्यांनी उधळलेले गुण राज्यात चर्चेत आले होते. कधी अधिकाऱ्याने तक्रार देण्यासाठीच आलेल्या महिलेसोबत केलेले लंपट चाळे हे राज्यभरात गाजले होते. तर एका तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी उधळलेले गुण देखील बारामतीकरांच्या चर्चेत चांगलेच होते. या घटना कुठेतरी पुसटच्या होत असतानाच आता नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांनी आपले गुण उधळायला सुरुवात केली आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्याकडून पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना अतिशय हीन व दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. साहेबाची पोलीस ठाण्यात होणारी एंट्री ही बाप जाद्याच्या वाड्यात होत असल्यासारखं त्यांचं वर्तन आहे. पाठीमागे हात टांगून तक्रार देणार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या आवाजात चढ्या आवाजात विचारपूस करून त्यांना घाबरून सोडत आहेत. कदाचित पोलीस स्टेशन हे त्यांना आपला वाडा आहे अशा अहिरभावात ते पोलीस स्टेशनमध्ये वावरतात. हे घाबरून जातात व आपण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येऊन आपण अपराध केल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
वास्तविक पाहता नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये सन्मानाची वागणूक देऊन त्यांची सेवा करणं हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. पोलिसांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती राहू नये यासाठी शासन स्तरावर देखील अनेक प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी नागरिक यांचा सुसंवाद राहून समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी. समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन नागरिकांबरोबर सुसंवाद साधत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र नागरिकांशी उरमटवर्तन करताना दिसून येत आहेत. पोलीस निरीक्षकांच्या या वर्तनाविरुद्ध काही संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता या पोलिस अधिकाऱ्यांला वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ्यावर आणणार..का आंदोलनाला सामोरे जाणार हे पहावं लागेल.