Saturday, July 12, 2025
jahirsabha.com
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता
No Result
View All Result
jahirsabha.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता

“बारामती”डॉक्टर अपहरण व खंडणी प्रकरणात एका परदेशी नागरिक व बोगस सहाय्यक पोलीस निरीक्षकाचाही सहभाग, आठ तासाच्या अपहरण नाट्यानंतर डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात.

जाहीर सभा by जाहीर सभा
June 13, 2024
in गुन्हेगारी जगत
A A
0
SHARES
1.4k
VIEWS

BY:मच्छिन्द्र टिंगरे : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून 50 लाख रुपये खंडणी उकळण्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. डॉक्टरच्या अपहरण व खंडणी उकळण्या प्रकरणांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा व एका बोगस सहाय्यक पोलीस  निरीक्षकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचे अपहरण व खंडणी प्रकरण बारामतीच्या सामाजिक वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहे.

 गेल्या आठवड्यात माळेगाव येथे गर्भलिंग  निदान करणाऱ्या एका डॉक्टर वरती गुन्हा दाखल झाल्याने बारामती मध्ये खळबळ उडाली होती. बारामती सारख्या तालुक्यामध्ये गर्भलिंग निदान केले जात आहे या बातमीने बारामतीकर नागरिक चिंतेत पडले होते. फलटण येथील शिंदे नामक डॉक्टर आणि त्याचा दलाल चार चाकी गाडीतून फिरून गर्भलिंग निदान करत असल्याचे घटना समोर आली होती. या गुन्ह्यामध्ये माळेगाव पोलिसांनी डॉक्टर शिंदे आणि त्याचा दलाल घुले यांना अटक केली होती. मात्र त्यानंतर डॉक्टरच्या गुण्या अगोदरच डॉक्टरचा अपहरण आणि खंडणीचा प्रकार झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टर कडून खंडणी उकळण्यासाठी अगोदर डॉक्टरचा अपहरण झालं आणि खंडणीची डिमांड पूर्ण झाली नाही म्हणून पोलिसांशी संपर्क साधून डॉक्टरने गुन्हा केला आहे असं दाखवून डॉक्टला जर बंद करण्यात आलं. डॉक्टर हा सराईत गुन्हेगार आहेच या अगोदर त्याच्यावरती गर्भलिंग निदान केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. परंतु त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठी बारामतीतल्या बारा आरोपींनी  केलेला उपदव्याप  देखील त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. 

 बारामतीतल्या जैन मंदिरात जवळ या सर्व गुन्हेगारांची मीटिंग झाली. त्यानंतर डॉक्टरला एक बोगस पेशंट दाखवून त्याच्याकडून तपासणी करून घ्यायची आणि त्यावेळेस त्याचा अपहरण करण्याचा कट शिजला. या गटामध्ये एक पेशंट बनून बारामतीच्या एमआयडीसी परिसरातील एक महिला सहभागी झाली. तिचे गर्भलिंग निदान करण्यासाठी बारामती तालुक्यातील माळेगाव जवळ असलेल्या चंदनगर भागामध्ये डॉक्टरला बोलवण्यात आलं. त्यावेळी ठरलेल्या कथा प्रमाणे बारामती मधून डॉक्टरचा पाठलाग करणारे काही आरोपी व माळेगाव मध्ये थांबलेले काही आरोपी सहभागी झाले. चंदनिया नगर येथील नियोजित खोलीमध्ये डॉक्टरांनी त्याचं गर्भलिंग निदान करण्याचा मशीन उतरवलं त्यानंतर काही वेळातच त्या खोलीचा दरवाजा वाजवून या आरोपींनी डॉक्टरला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या गाडीवरती बसून डॉक्टर आणि त्याचा दलाल याचे अपहरण केले. 

 डॉक्टरची अपहरण करून बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी च्या परिसरामध्ये असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये त्याला नेण्यात आलं. तेथून डॉक्टरला एका बाजूला व त्याच्या दलाला एका बाजूला करण्यात आलं तेव्हापासून डॉक्टरला 50 लाख रुपये खंडणीची डिमांड करण्यात आली. या मंगल कार्यालयामध्ये एक बोगस एपीआय व एक धनाजी नावाचा कर्मचारी सहभागी झाला त्यांनी आम्ही पोलीस असल्याची भीती डॉक्टरला दाखवली खंडणी न दिल्यास तुझ्यावरती गुन्हा दाखल होणार असल्याचेही सांगितलं.  डॉक्टरने दहा लाख रुपया वरती डील कबूल केली पैशाची तजबीज केली तोपर्यंत डॉक्टरला सातारा जिल्ह्यातील राजाळे आसू पवारवाडी तसेच तावशी येथील निरा नदीच्या बंधाऱ्यावरती आणण्यात आलं. येथून पुढे परत डॉक्टरला इंदापूर तालुक्यातील जांब आणि सोलापूर जिल्ह्यातील कुरू बावी या ठिकाणीही डॉक्टरला फिरवण्यात आलं. 

 या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने पोलिसांना अगोदरच आपल्याला डॉक्टर मिळणार आहे याची टीप दिली होती मात्र ज्यावेळेस डॉक्टरचा अपहरण केलं त्यावेळेस त्याने स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला. त्यामुळे ज्या पोलिसांना टीप मिळाली होती ते पोलीस या आरोपीच्या शोधा वरती होते. अर्धवट माहिती नंतर मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी डॉक्टर आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आरोपी आणि डॉक्टर इंदापूर तालुक्यातल्या जांब या ठिकाणी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस आपल्या मागे वरती आहेत आणि आता डॉक्टरला अटक होणार आणि आपल्या वरती ही गुन्हा दाखल होणार या भीतीने आरोपी तेथून डॉक्टरचा ठाव ठिकाणा सांगून फरार झाले. त्यानंतर डॉक्टरला बारामती तालुक्यातील मळद या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान हा खंडणीसाठी अपहरणाचा नाट्य उघडकीस आलं  मात्र याच्यात गुन्हा दाखल होत असताना दिरंगाई होत आहे त्यामुळे परत एकदा पोलिसांच्या कारवाईमध्ये शंका निर्माण होत आहे. 

Tags: Ajit PawarBaramatiBaramati CrimeHolydaySharad PawarSunetra Pawar
SendShareTweetTweet
Previous Post

चोराला लुटण्यासाठी दरोडेखोर एकवटले, खंडणीसाठी डॉक्टर अपहरण प्रकरणात सराईत गुन्हेगारांसह बारा जण आरोपी, बारामतीच्या गर्भलिंग निदान प्रकरणाने घेतले वेगळे वळण, 

Next Post

बारामतीतल्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर. डॉक्टरचे खंडणीसाठी अपहरण करणारा मास्टरमाईंड व त्याचे सहकारी आरोपी मात्र फरार. अपहरण कर्त्यांची उलटी गिनती सुरु. 

Related Posts

गुन्हेगारी जगत

एकीशी प्रेमं, दुसरीशी लग्न, सावरगाव च्या अक्षय शिंदे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल.

March 12, 2025
गुन्हेगारी जगत

रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घबाड खाल्ल्याचे समोर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, करे कुटुंब अजितदादांना भेटणार.

January 18, 2025
गुन्हेगारी जगत

बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

January 16, 2025
गुन्हेगारी जगत

गावगुंड आणि पांढरपेशी सावकारांच्या त्रासाला कंटाळून माजी उपसरपंच महिलेच्या पतीची आत्महत्या.

January 14, 2025
गुन्हेगारी जगत

80 वर्षाच्या लंपट म्हाताऱ्या कडून, मतिमंद मुलीवर बलात्कार, इंदापूर तालुक्यात खळबळ.

September 26, 2024
गुन्हेगारी जगत

“संदीप सिंह गिल” आता पुणे ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांची बदली.

September 5, 2024
Next Post

बारामतीतल्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर. डॉक्टरचे खंडणीसाठी अपहरण करणारा मास्टरमाईंड व त्याचे सहकारी आरोपी मात्र फरार. अपहरण कर्त्यांची उलटी गिनती सुरु. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

एकीशी प्रेमं, दुसरीशी लग्न, सावरगाव च्या अक्षय शिंदे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल.

March 12, 2025

रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घबाड खाल्ल्याचे समोर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, करे कुटुंब अजितदादांना भेटणार.

January 18, 2025

बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

January 16, 2025

गावगुंड आणि पांढरपेशी सावकारांच्या त्रासाला कंटाळून माजी उपसरपंच महिलेच्या पतीची आत्महत्या.

January 14, 2025

80 वर्षाच्या लंपट म्हाताऱ्या कडून, मतिमंद मुलीवर बलात्कार, इंदापूर तालुक्यात खळबळ.

September 26, 2024

सर्वाधिक पसंतीच्या

  • बारामतीतं पुन्हा गँगवॉर ,अल्पवयीन गुन्हेगाराचा खून,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भिगवन येथील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका, आरोपींना वाचवण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ही दिली खोटी माहिती. आणखी आरोपींची नाव निष्पन्न होऊ नाही आरोपी करण्यास पोलिसांचा नाकार. 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भिगवण येथील विवाहिता आत्महत्या प्रकरणी आरोपी पळवून लावण्यात आणि वाचवण्यात, एपीआय महांगडे यांचा हात. हातात असलेले आरोपी पळून जातात तेव्हा त्याचा “अर्थ”  व्यवस्थित लागलेला असतो.  

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉक्टर अपहरण व खंडणी नाट्यातील आरोपींचे फासे फिरले, अपहरणाची घटना सी.सी.टीव्ही मध्ये कैद, तो मी नव्हेचं म्हणणाऱ्या आरोपीचा बुरखा फाटला.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2024 Jahir Sabha - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता

© 2024 Jahir Sabha - Technical Support by DK Technos.