BY:मच्छिन्द्र टिंगरे – बारामती तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या दलाला अटक झाली. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर काल गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर शिंदे आणि त्याचा दलाल घुले यांना काल कोर्टासमोर हजर करण्यात आलं. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीं डॉक्टर शिंदे यांचे वकील अँड. अमर काळे व दलाल घुले यांचे वकील अँड सुधीर पाटसकर यांनी जामीन अर्ज दाखल केला वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे या डॉक्टर आणि त्याच्या दलालाचे खंडणीसाठी त्यांचे अपहरण करणारे आरोपी मात्र सध्या फरार आहेत. त्यामुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला बोलावून घेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकारामध्ये असलेल्या आरोपींची सध्या उलटी गिनती सुरू झाली आहे.
बारामती तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या दलालावर दलाला पोलिसांनी मशीनसहित ताब्यात घेतलं होतं. सरकाऱी डॉक्टर महेश जगताप यांनी या आरोपींच्या विरोधात गर्भलिंग निदान करत असलेल्या गुन्ह्याबाबत तक्रार दाखल केली होती. यावरून गुन्हा दाखल करून माळेगाव पोलिसांना या दोन्ही आरोपींना अटक केली होती. या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी केलेल्या तपासात हा गुन्हा करण्याच्या अगोदर त्यांचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अपहरण कोणी केले कशासाठी केले याचा तपास पोलीस घेत आहेत.
दरम्यान अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी कट रचून डॉक्टर आणि त्याच्या दलालाचे अपहरण केलेले होते. या कटामध्ये एक बोगस एपीआय आणि पोलीस कर्मचारी देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे डॉक्टर आणि त्याच्या दलालाचे अपहरण करताना पहिल्यापासून एका माने नामक कर्मचाऱ्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पोलीस कर्मचाऱ्याने डॉक्टरला आपण पोलिस असल्याचे आय कार्ड देखील दाखवले होते. खंडणी द्या नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू अशा प्रकारची भीती या पोलीस कर्मचाऱ्यांने डॉक्टरला दाखवली होती. त्यानंतर डॉक्टरच्या अपहरण नाट्य मध्ये संपूर्ण प्रवासात हा पोलीस कर्मचारी सहभागी होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या दुसरी टीम पोहोचतात या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दरम्यान या गुन्ह्यातला मास्टर माईंड आणि त्याचा सहकारी सध्या फरार आहेत . तर या गुन्ह्यातले इतर आरोपी आपलं काय होणार या विचाराने चिंताग्रस्त आहेत.