BY : मच्छिन्द्र टिंगरे – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील कंत्राट घेण्यासाठी काही लोकांनी एकत्र येऊन बनावट कागदपत्र सादर करून कंत्राट मिळवले होते. याप्रकरणी झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रमुख आरोपी असलेला अंकुश बबन निकम याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र हे प्रकरण दिसते एवढे साधन असून यात आणखी दोन शासकीय अधिकारी व अन्य काही लोकही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र अद्याप अजून यातील बाकीच्या आरोपींवर कारवाई का नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
झारगडवाडीतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एका कामाचे टेंडर घेण्यासाठी अंकुश बबन निकम यांनी बंद लिफाफ्यामध्ये बनावट डीडी टाकल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला अंकुश बबन निकम यांनीच केले आहे असं वाटत असताना, यातील काही तपास पाहिला असता याच्यात अजून चार आरोपी निष्पन्न झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता उरलेले या चार आरोपींना पोलीस कधी अटक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अटक असलेला आरोपी अंकुश बबन निकम याने बनावट डिलीट टाकला परंतु टेंडर मिळवून देण्यासाठी काही लाख रुपयांची तडजोड ठरली होती असं तपासात निष्पन्न होत आहे. ठरलेली रक्कम दिली नाही याच्यावरून शासकीय अधिकारी व कंत्राटदार अंकुश निकम यांच्यात घटका उडाला. त्यातून तक्रार दाखल करण्यात आली मात्र याच्यामध्ये पडद्यामागे बरच काही शिजल्याच समोर आला आहे.
ज्या ठेकेदाराच्या नावावरती अंकुश निकम यांनी काम घेतले होते ते जामदार नावाचे गृहस्थ हे बेलवाडी तालुका इंदापूर येथील रहिवासी आहेत. ज्यावेळेस जामदार व निकम यांना समोरासमोर आणले त्यावेळेस जामदार व निकम हे दोघे एकमेकांना कधीच भेटले नव्हते त्यामुळे त्यांनी एकमेकांना ओळखले देखील नाही. मग जामदार यांच्या नावाने टेंडर भरण्यासाठी लागणारी “की”(पासवर्ड )कोणी वापरली असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कोणत्याही ठेकेदाराची की वापरल्याशिवाय टेंडर भरता येत नाही किंवा ते उघडताही येत नाही. जबाब सांगितले की मी निकम यांना ओळखत नाही किंवा मी कधीच यांना पाहिलेले नाही आणि हे टेंडर माझ्या नावावर ती कोणी भरले हे मला माहीतच नाही. त्यावेळेस टेंडर प्रक्रिया केली जाणाऱ्या टेंडर ऑफिसमध्ये आणि तत्कालीन एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मिळून हा गोलमाल केला आहे. त्यामुळेच टेंडर ओपन झाल्यानंतर या टेंडर साठी जमा करण्यात आलेला डीडी देण्याच्या अगोदरच वर्क ऑर्डर देण्यात आली होती. त्यामुळे आता या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये बाकीच्या आरोपींना कधी अटक होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणात काही आरोपींना पाठीशी घातल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.