BY :मच्छिन्द्र टिंगरे – बारामती शहरानजीक असलेल्या जळोची येथे राहणारा अल्पवयीन गुन्हेगार गणेश वाघमोडे यांचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात वर्मी घाव घालून खून केला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश वाघमोडे याचा जळोची जवळ असलेल्या काळा ओढा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायएसपी तसेच पोलीस फौज फाटा घटनास्थळी पोहोचला आहे.
यातील मयत असलेला गणेश वाघमोडे याच्यावरती यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. याशिवाय अन्य काही गुन्हेही त्याच्यावरती दाखल होते. गणेश वाघमोडे यांना अल्पवयीन असतानाच एक निर्घृण खून केल्याने तो चर्चेत होता. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत अनेक गंभीर गुन्हे झाले आहेत. यातील आरोपी अद्याप निष्पन्न झाले नाही तोच अजून एक खून झाल्याने बारामती एमआयडीसी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथक कार्यरत झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गॅंगवॉरचाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.