BY : मच्छिन्द्र टिंगरे – नेहमी वादग्रस्त विषयातून चर्चेत असलेले झारगडवाडी आता आणखी एका भानगडी मुळे चर्चेत येणारं आहे. ग्रामपंचायत मधील कामाचा ठेका मिळवण्यासाठी काही लोकांनी एकत्र येऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बनावटगिरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता अंकुश बबन निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्रामपंचायत झारगडवाडी मध्ये जिल्हा परिषदेच्या निधीतून ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या एका कामाचे ऑनलाईन टेंडर काढायचे होते. हे टेंडर काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठेकेदारांनी बोगस कागदपत्रांचा जुमला केले असल्याचे समोर आले आहे. टेंडर प्रोसेस पूर्ण करण्यासाठी द्यावा लागणारा डीडी हा बनावट असल्याचे या घटनेत समोर आले आहे.
ज्या कामाची निविदा उघडण्यात आली होती त्याच्यामध्ये बेलवाडी येथील जामदार नावाच्या ठेकेदाराला हे काम मिळाले होते. मात्र यासाठी लागणाऱ्या टेंडर साठी भरावा लागणार डीडी हा अंकुश बबन निकम यांच्या नावाचा असून तो बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा ठेका मिळवण्यासाठी अंकुश बबन निकम व त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्र दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. सरपंच अजित बोरकर यांची फिर्याद दाखल करण्यात आली व अंकुश बबन निकम यांना पोलिसांनी अटक केले आहे.
या प्रकरणाची कागदपत्र समोर आल्याच्या नंतर ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्यांच्या पतींनी देखील उपद्वाप केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास झारगडवाडीचे आरोपी होऊ शकतात. त्यामुळे आता पोलीस तपासात हे प्रकरण समोर आल्यास याही ग्रामपंचायत सदस्यांना अटक होण्याची शक्यता आहे.