BY : मच्छिन्द्र टिंगरे
भिगवण येथील बाळासाहेब काळे या माशाच्या व्यापारी असलेल्या कुटुंबातील नवविवाहित सुनेने गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणांमध्ये आरोपींना सोडून देण्यापासून ते समाजामध्ये खोटी माहिती देण्यापर्यंतची मजल भिगवण पोलिसांची गेली आहे. आरोपींनीच दिलेल्या माहितीच्या आधारावरती सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांनाही पोलिसांनी खोटी माहिती दिली. याशिवाय गळफास झाल्याचे प्रकरण असतानाही आरोपी सोडून दिल्याचेही समोर आले. तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होऊन देखील त्यांना आरोपी करता येत नसल्याचे तक्रारदारांना पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडे संशयाची सुई वळत आहे.
या घटनेतील घटनाक्रम पाहता पोलिस तपासात हलगर्जीपणा करत असून आरोपींनाच मदत करण्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. मयत असलेल्या माहेरच्या गरिबीचा फायदा घेऊन पोलीस त्यांची दिशाभूल करत आहेत. या विवाहितेने 15 जून रोजी गळफास घेतला होता. त्याच दिवशी गुन्हा दाखल न करून घेता, आरोपींना पळून जाण्यास मुभा दिली. अशिक्षित असलेल्या माहेरच्या लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन एफ आय आर मध्ये अनेक त्रुटीही राहिल्या आहेत. दरम्यान मयत मुलीच्या आईच्या जवाबदातून अनेक गोष्टी समोर आले असून त्यामध्ये विवाहित मुलीला टॉर्चर करणाऱ्या लोकांमध्ये आणखी तीन महिलांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मयत असलेल्या विवाहितेचा नवरा दिर सासरा सासू संतोष धुमाळ जाऊ आणि मनीषा धुमाळ नामक एका महिलेने तिला दिनांक 13 जूनला आई-वडिलांसमोर टॉर्चर केले होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मोबाईल वरून इंस्टाग्राम वरून कोणाशी बोलत आहेत त्यांच्यासोबत तुझे अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिच्यावरती आई-वडिलांसमोर केला होता. 14 तारखेला तिचा दीर अक्षय काळे यांनी तिच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मधील अनेक लोकांना फोन करून शिवीगाळ केली होती. या सर्व प्रकाराने मयत विवाहिता व्यतीत झाली होती. संशयाचे भूत बसलेल्या सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून अखेर 15 जूनला तिने गळफास लावून आत्महत्या केली.
हे मला मारून टाकतील, मला मदत करा. सकाळी मदत मागितीली आणि शेवटी घात झालाचं
15 जून रोजी या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली त्या दिवशी सकाळी तिने नात्यातील एका मुलाला मेसेज करून. सांगितले होते की काही करून मला इथून बाहेर काढा हे सगळेजण मिळून मला मारून टाकतील प्लीज मला मदत करा. बारा वाजेपर्यंत मला बाहेर काढा. असा मेसेज केला होता. आणि दरम्यान साडेबारा ते एक च्या दरम्यान या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे या विवाहितेला आपला जीव जाणार आहे हे दिसून येत होतं असं एकंदरीत प्रकरण समोर येत आहे. तरीदेखील पोलीस आरोपींना मदत करत आहेत.
तो कारखान्याचा डायरेक्टर कोण?
दरम्यान या आत्महत्या प्रकरणात एका साखर कारखान्याचा संचालक पोलिसांच्या संपर्कात असून आरोपींना मदत करण्यापासून ते सोडवण्याची जबाबदारी देखील त्यांनाच घेतली असल्याचे समोर येत आहे. पोलिसांना मॅनेज करण्यासाठी हातखंड असलेला हा डायरेक्टर या प्रकरणात सक्रिय असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.