BY : मच्छिंद्र टिंगरे
भिगवण येथील नावलौकिक असलेला मास्याचा व्यापारी बाळासाहेब काळे यांच्या सुनेने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात आरोपी अटक न करता पळवून लावण्यात काही आरोपींना वाचवण्यात एपीआय महांगडे यांचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी झालेला बेबनाव याला मोठा “अर्थ” असल्याचंही बोललं जात आहे.
15 जून रोजी भिगवन येथील मास्याचे व्यापारी बाळासाहेब काळे यांच्या सुनेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी काळे कुटुंबीयांनीच तिचे प्रेत खाली घेतले होते. स्वतः दवाखान्यात नेऊन पोस्टमार्टम करून तिचा अंत्यविधी देखील झाला होता. या अंत्यविधीला घरातील सर्व लोक उपस्थित होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल न करून घेता. आरोपींना पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ दिला. व गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी आरोपींना वाचवण्यासाठी एपीआय महांगडे यांची धडपड ही काही “अर्थाने” तर नाही ना असा संशय व्यक्त होत आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसा अगोदर सासरच्या आणि माहेरच्या लोकांची एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीत आत्महत्या झालेली विवाहिता हिच्या मोबाईल वापरण्यावरून वाद झाला होता. तिने व मोबाईल वापरू नये या गोष्टीला संमती दिली होती. तरीदेखील 13 व 14 जूनला या विवाहितेचा मानसिक छळ करण्यात आला. काळे कुटुंबातील सर्व पुरुषाने महिलांनी व नातेवाईकांनी मिळून तिला टॉर्चर केले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नातेवाईकांना फोन करून तिची बदनामी केली.
स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी घरात आलेल्या लक्ष्मीला बदनाम केलं. काळे कुटुंबातल्या ओंकार च लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं. घरातली लक्ष्मी म्हणून जिन उंबऱ्यावरचे माप ओलांडलं होतं. तिच्याच बाबतीत घरातल्या सगळ्याच लोकांच्या डोक्यात संशयाचे भूत बसलं अन घरच्याच लक्ष्मीला त्याने बदनाम केलं, अनेक पाहुण्यांना तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा कांगावा केला. त्यामुळे ही नवविवाहिता मृत्यूनंतर ही बदनाम ठरू लागली. मात्र तिच्या मृत्यूनंतर सत्य जगासमोर येऊन तिला न्याय मिळेल का हा प्रश्न कायम अनु उत्तरीत राहील.