BY : मच्छिन्द्र टिंगरे – इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावामध्ये एका 21 वर्षीय पूर्ण मतिमंद असलेल्या मुलीवर 80 वर्षाच्या अजमुद्दीन बाबा पठाण या लंपट म्हाताऱ्याने पाशवी बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने वालचंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. यातील दुर्दैवाची बाब म्हणजे आरोपीने धार्मिक ठिकाण असलेल्या मज्जीद च्या बाथरूम मध्ये हा अत्याचार केला आहे. गुन्हा घडल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपीला अटक करून जेल मध्ये पाठवले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात, या पीडित मतिमंद मुलीची आई वडील शेतमजूरी करतात. आई दुपारी कपडे धुण्यासाठी गेली असता. या लंपट म्हाताऱ्याने या मुलीस पेरू खाण्याचे आमिष देऊन मज्जीद च्या शेजारी असलेल्या बाथरूम मध्ये घेऊन गेला. बाथरून मध्ये तीच्या पाशवी बलात्कार केला. आई कपडे धुवून परत आल्यावर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरु केली. सर्वत्र शोध घेऊन पण मुलगी मिळून आली नाही. त्यावेळी हा लंपट म्हातारा नको त्या अवस्थेत बाहेर पडला. मुलीच्या आईला शंका आली. त्यावेळी त्या आईने पळत जाऊन बाथरून मध्ये पहिले असता. आईला धक्का बसला. मुलीला त्याचं अवस्थेत पोलीस स्टेशन ला घेऊन गेले. वालचंदनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अजमुद्दीन बाबा पठाण ता लंपट म्हाताऱ्याला अटक केली आहे.
तुमची मुलगी असती तर….
आई वडील मजुरी करतात, गरीब कुटुंबातील या कुटुंबाला गावातील काही लोकांनी गुन्हा दाखल करू नका अशी विनंती केली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढुणगे यांनी या तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांना तुमची मुलगी असती तर अशीच मागणी केली असती का असे खडे बोल सुनावत पोलीस ठाण्याच्या बाहेर हाकलून दिले. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून घटनेतील तपास कामावर लक्ष दिले. हा खटला फास्टट्रक मध्ये चालवला जाईल असे ही सांगण्यात येत आहे.