BY : मच्छिन्द्र टिंगरे
13 मे रोजी घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालीद यांना जबाबदार धरण्यात आले आहे. चौकशी समितीने महाराष्ट्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात खालीद यांनी अक्षम्य चुका केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्र सरकारने खालीद यांना निलंबित केले आहे. अशा वृत्त ANI वृत्त संस्थेने प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील आतापर्यंत सर्वात कारवाई मानली जात आहे.
घाटकोपर येथील होर्डिंग होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेवरून राज्यात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. बेकायदा होर्डिंगला परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या घटनेमध्ये होर्डिंगच्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल नुकताच सरकारला सादर करण्यात आला. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी पोलीस महासंचालकांच्या परवानगीशिवाय या होर्डिंगला परवाना दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार धरून डीजीपी कैसर खालिद यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे सहसचिव वेंकटेश भट निलंबनाचे पत्र कैसर खालिद यांना पाठवले आहे. यामध्ये कैसर खालिद यांनी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय बाहेर पडता येणार नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार धरून आणखी कोणती मोठी कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.