BY: मच्छिन्द्र टिंगरे –
सात तारखेला माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये गर्भलिंग चाचणी करणाऱ्या फलटण येथील डॉक्टर शिंदे व त्याचा दलाल घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी या डॉक्टरचे बारामतीतल्या काही सराईत गुन्हेगारांनी कट रचून खंडणीसाठी अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावर दहा लाख रुपयांची तडजोड झाले आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी वेळ गेला तोपर्यंतच गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची वाटणीवरून वादविवाद झाले आणि आरोपीने एकमेकांविरोधात पुरावे तयार करायला सुरुवात केली. मिळालेल्या पैशातून आपल्याला काहीच मिळत नाही असे दिसल्यानंतर एका गटाने या गुन्ह्याला वाचा फोडली.
माळेगाव येथील चंदन नगर परिसरामध्ये बनावट गर्भवती महिला दाखवून या डॉक्टरला गर्भलिंग चाचणी करण्यासाठी बोलावून घेण्यात आलं होतं . चंदन नगर परिसरातील दोन खोल्यांमध्ये डॉक्टर आणि त्याचा दलाल थांबलेले असतानाच बनावट ग्राहक बनून गेलेल्या गुन्हेगारांनी डॉक्टर व त्याचा दलाल या दोघांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले. माळेगाव मधून आरोपींनी फलटण रोडला निघत एका कार्यालयाजवळ थांबले तेथून आर्थिक देवाण-घेवाण्याची चर्चा झाली व पुढे डॉक्टरला फिरवत ठेवण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील राजाळे आसू फलटण या परिसरामध्ये डॉक्टरला फिरवण्यात आलं. 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी होत होती. अखेर या खंडणीची दहा लाखावरती तडजोड झाली. पैसे येत नाहीत तोपर्यंत डॉक्टरला नीरा नदीच्या परिसरात असलेल्या एका बंधाऱ्याजवळ ठेवण्यात आलं.
दरम्यान या गुन्ह्यातल्या मास्टर माईंडने ज्या पोलिसांना आपण तुम्हाला माहिती देऊ असे सांगितले होते त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. मास्टरमाइंड बरोबर असलेल्या आरोपींनी पैसे मिळायला उशीर होत असल्यामुळे डॉक्टरचा काटा काढला पाहिजे नाहीतर हा खेळ आपल्या अंगणात येईल अशा प्रकारची भाषा वापरली होती. दरम्यान दुसरा गट हा डॉक्टरला होणाऱ्या अमानुष मारहाणीमुळे घाबरला होता त्यांनी त्याबाबत काही व्हिडिओ तयार करून ठेवायला सुरुवात केली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना मिळत होत्या डॉक्टरांच्या बाबतीत काहीतरी गडबड झाली आहे. हे कळताच वरिष्ठांनी दुसरं पथक डॉक्टरच्या शोधावर ती पाठवलं. त्या ठिकाणी वेळेवर पोचल्यामुळे डॉक्टरची वेळ टळली अन्यथा डॉक्टरच्या जीवाचे बरे वाईट होण्याची दाट शक्यता होती.
दुसरीकडे या गुन्ह्यामध्ये माने नावाचा एक पोलीस कर्मचारी या गुन्ह्यात सहभागी झाला होता. त्याच्या सहभागाने डॉक्टरांचा अपहरण होऊन खंडणी मागितल्याचा प्रकार झाला होता. याशिवाय यांच्याबरोबर एक बोगस सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील हजर होता. जवळपास दहा ते बारा लोकांनी एकत्र येऊन हा घोणा केल्याची प्राथमिक माहिती जाहीर सभांच्या सूत्रांकडून मिळत आहे.
महत्त्वाचे
या गुन्ह्याला मास्टरमाइंड डॉक्टरचे अपहरण करण्यापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून एक डॉक्टर गर्भलिंग चाचणी करण्यासाठी येणार आहे. तुम्ही मदत करा अशा प्रकारची माहिती दिली होती. परंतु या मास्टरमाइंडने ज्यावेळेस त्याच्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टरला ताब्यात घेतले तेव्हापासून स्वतःचा मोबाईल बंद करून ठेवून पोलिसांशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे या मास्टरमाईंड च्या कृतीवर पोलिसांचा संशय बळावला आणि योग्य वेळी डॉक्टरचा पोलिसांच्या ताब्यात मिळाला.