BY : मच्छिन्द्र टिंगरे
अनेक कोवळ्या जीवांची पोटातच हत्या करणारा डॉक्टर मधुकर शिंदे याचं माळेगाव मधून खंडणीसाठी अपहरण झालं होतं. या अपहरण नाट्याची चर्चा गेली आठवडाभर बारामती तालुक्यात चालू आहे. याच्यातील आरोपींनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली होती. अपहरण झालं त्या ठिकाणी असलेल्या एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळा घटनाक्रम कैद झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यात असलेले आरोपी महिला वाहन या या सर्व बाबी समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे माळेगाव पोलीस स्टेशनच्या समोरून जवळच असलेल्या एका भागामध्ये हे नाट्य घडलं होतं आणि तेथून पुढे डॉक्टरला आरोपींनी खंडणीसाठी तीन जिल्ह्याचा हद्दीत फिरवले होते. जाहीर सभा ने गेले पाच दिवस डॉक्टरचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचा दावा केला होता याला आता बळ मिळाले आहे.
तपास अधिकारी भांगे यांची भूमिका संशयास्पद
डॉक्टर मधुकर शिंदे हा गर्भलिंग निदान करण्याच्या गुन्ह्यामध्ये तब्बल पाच दिवस पोलीस कोठडीमध्ये होता. त्यावेळी हा घटनाक्रम भांगे यांना आरोपींनी सांगितला नव्हता का? असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि जर तो घटनाक्रम सांगितला असेल तर अद्याप या आरोपींवरती किडनॅपिंग आणि खंडणीचा गुन्हा का दाखल झाला नाही. हा संशोधनाचा भाग आहे.दुसरीकडे आरोपीला पाचच दिवसात जामीन मिळाला.त्यामुळे अनेक कोवळ्या जीवांची हत्या करणारा डॉक्टर मधुकर शिंदे याला जामीन कसा मिळाला याचीही चर्चा बारामती तालुक्यात रंगली आहे. यापूर्वी डॉक्टरने असे किती गुन्हे केले याबद्दल तपास का करण्यात आला नाही. त्यामुळे या अगोदर चार गुन्हे दाखल असून देखील ही हा डॉक्टर कायम मोकाटच राहत आहे.
अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विशाल रुपनवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपी अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. तर या गुन्ह्यातील एक महत्त्वाचा आरोपी नेपाळचा आहे सध्या तो बारामती शहरातील एका जिम मध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे हा गुन्हा करत असताना अनेकांना डॉक्टरचे अपहरण माय होत आहे हे माहिती असताना खंडणीतून मिळणाऱ्या पैशात वाटा मिळावा म्हणून उरलेले आरोपी गुन्ह्यात सहभागी झाले आहेत.
डॉक्टरचे अपहरण नियोजित कट
डॉक्टर मधुकर शिंदे हा नेहमीच गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती विशाल रुपनवर आणि त्याच्या सहकाऱ्यांना होती. त्यांनी डॉक्टरला एका महिलेचे गर्भलिंग निदान करावयाचे असल्याचे सांगून बोलावून घेतले होते. सुरुवातीला बारामती शहरात या डॉक्टर वरती ट्रॅप लावण्यात आला होता. या ट्रॅपमध्ये कारवाई करण्यासाठी जास्त संख्येने पोलीस येत असल्याचे पाहून विशाल रुपनवर याने तात्काळ त्याचा प्लॅन बदलला. आणि डॉक्टरला माळेगाव परिसरात बोलावून घेतले. व तिथं एका पोलीस कर्मचाऱ्याला सहभागी करून घेतले. खंडणी मिळालीच तर त्याच्यामध्ये जास्त वाटे पडायला नको म्हणून विशाल रुपनवर हा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना संपर्क साधत असल्याची माहिती देखील समोर आले आहे. डॉक्टरचे अपहरण केल्यानंतर त्याला कोणतरी पोलीस कर्मचारी हे दाखवायचे होते म्हणून माने नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सहभागी करून घेण्यात आले होते.