BY : मच्छिन्द्र टिंगरे -बारामती तालुक्यातल्या माळेगाव येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या फलटण येथील शिंदे या डॉक्टरला अटक करण्यात आले. त्यानंतर बारामती तालुक्यामध्ये बेकायदा गर्भलिंगनिदान करत असल्याचे प्रकार उघडकीस आला. मात्र हा प्रकार एका सराईत गर्भलिंग निदान करत असलेल्या डॉक्टर कडून खंडणी उकळण्यासाठी केल्याचा समोर आला आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात आरोपी असलेला डॉक्टर हा सराईत गुन्हेगार आहेच, परंतु याने या प्रकरणातून कमावलेल्या काळ्या पैशावरती बारामती तालुक्यातल्या काही गुन्हेगारांचा डोळा होता. त्यामुळे बनावट महिला तयार करून तिला गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठवण्यात आले व त्याचवेळी या गुन्हेगारांनी डॉक्टरचा अपहरण केले. त्यानंतर सुरू झाला खंडणी व अपहरणाचा थरारक प्रकार.
बारामती तालुक्यातील एका एजंटच्या मार्फत हा डॉक्टर गर्वलंग निदानाचे काम करत होता. यातून या डॉक्टरने अमाप माया कमवल्याची माहिती बारामतीतल्या काही सराईत गुन्हेगारांना मिळाली. या डॉक्टरला गर्वलिंग निदान करताना पकडायचा आणि त्याच्याकडून 50 लाख रुपये खंडणी उकळण्याचे प्लॅनिंग बारामती मध्ये झालं. यामध्ये काही महिला व गुन्हेगार व इतर काही नामांकित लोकांनी सहभाग घेतला. ठरल्याप्रमाणे बनावट महिला तयार करण्यात आली तिला माळेगाव येथील चंदन नगर या परिसरात नेण्यात आलं, महिलेची तपासणी करण्याच्या पूर्वीच डॉक्टर आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा दलाल या दोघांनाही या गुन्हेगारांनी ताब्यात घेतलं तेथे मारहाण करून तेथून त्यांच अपहरण केलं. त्यानंतर डॉक्टर व त्याच्या सहकार्याला माळेगाव येथून जवळच असलेल्या एका मंगल कार्यालयाच्या जवळ घेण्यात आल. तेथून डॉक्टर व त्याचा दलाल या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं. डॉक्टरला त्या ठिकाणावरून निरावागज मधून राजळे या गावाकडे नेण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टरला 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. हे खंडणी देत नाही तोपर्यंत डॉक्टरला या गुन्हेगारांनी फिरवत ठेवलं. त्याला राजाळे आसू पवारवाडी तावशी जांब या गावांमध्ये नेण्यात आलं. मागणीप्रमाणे तोडजोड करून डॉक्टरने दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले.त्यानुसार डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला फोन केला आणि पैशाची तडजोडही करायला लावली.
दरम्यान या प्रकरणामध्ये खंडणीच्या स्वरूपात धन मिळवण्यासाठी एका धनाजीनं आपल्या वर्दीशी बेइमानी केल्याचाही प्रकार समोर येत आहे. या अपहरण प्रकरणात धनाजी माळेगाव पासूनच आरोपीं बरोबर होता अशी माहिती आणि त्याचे पुरावे जाहीर सभा च्या टीमच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास असलेले माळेगाव पोलीस या प्रकरणात नेमकं कोणाकोणाला आरोपी करतात याचा तपास कसा करतात हे पाहावे लागणार आहे. या प्रकरणातील पाळेमुळे जुळलेली असल्यामुळे याची कम्प्लीट चेन जुळवण पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होणार याकडे बारामतीकरांचे लक्ष आहे.
खंडणीसाठी ठरलेले दहा लाख रुपये घेऊन येणारा ठोंबरे नामक एक व्यक्ती सांगवीच्या पुलावरती पोहोचलेला होता. तोपर्यंतच बारामती शहरातील एक अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी हालचाली वाढवल्या. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच यातील एका आरोपीने डॉक्टर बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मळद गावाच्या परिसरामध्ये असल्याचे एका आरोपीने सांगितले. त्यानंतर बारामती पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्याकडे असलेले गर्भलिंग निदान करण्याचे मशीन सरकारी डॉक्टरांच्या समक्ष ताब्यात घेतले आणि त्यांना माळेगाव पोलिसांकडे सुपूर्द केले.