BY : मच्छिन्द्र टिंगरे – बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी एम. आय. डी. सी येथील एका हॉटेल मध्ये कमी पैशात फॉरेन टूर चे पॅकेज देण्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी फसवणूक करणारी टोळी पोलीसांनी पकडली होती. यात एका तक्रारदाराने गुन्हा दाखल केला होता. यात यातील जवळपास आठ आरोपीना गुन्ह्यातील महत्वाच्या कागदपत्रासहित ताब्यात घेतलं होतं मात्र त्यानंतरं या गुन्ह्यातील तपास अधिकारी यांना अचानक मोठ्या आजाराने त्रासले त्यामुळे ते रजेवर आहेत. इकडं आरोपी मोक्कार सहलीचा आनंद घेत आहेत. मात्र फिर्यादी पोलीस ठाण्यात हेलपाटे घालून त्रासले असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. सात जून रोजी बारामती एम. आय. डी. सी. परिसरातील एका हॉटेल मध्ये सोविनिअर इंटरनॅशनल या बोगस कंपनीच्या लोकांनी पाच दिवस मुक्काम ठोकला होता. यात बारामती दौंड इंदापूर तालुक्यातील अनेक लोकांना गिप्ट द्यायचं आहे म्हणून या हॉटेल मध्ये बोलावून घेण्यात आलं. त्यानंतर तिथं जोडीने यायला भाग पाडले.त्यानंतर तिथं आलेल्या लोकांना फॉरेन टूर चे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये लाटण्यात आलेत. ही टोळी अत्यंत सराईत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.आतापर्यंत या टोळीने धाराशिव, पंढरपूर, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुबंई, पालघर अशा अनेक ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी देखील या टोळीला पोलिसांकडून अभय देण्यात आलं आहे.
ज्या दिवशी रेड करून या टोळीला पकडले यात स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी अधिकाऱ्यांना सांगून या आरोपीना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र या गुन्ह्यातील तपासअधिकारी यांना अचानक आजारपणाला सामोरे जावं लागल्याने ते दीर्घकालीन रजेवर आहेत. मात्र या गुन्ह्यात कोणतीही कारवाई नं करता आरोपीना अभय देण्यात आल्याचं बोललं जात आहे . विशेष म्हणजे या गुन्ह्यात अत्यंत गंभीर बाबी समोर येऊन सुद्धा आरोपीना अभय का देण्यात येत आहे. हे प्रकरण बारामती तालुक्यातील पाठीमागे झालेल्या “सात लाखाच्या” हेराफेरी सारखं चर्चेत येणारं हे मात्र दिसत आहे.