BY : मच्छिन्द्र टिंगरे – तुमच्या फोनवर अनोळखी नंबर वरून फोन येतो. आमच्या कंपनीच्या ऑफिसची ब्रांच तुमच्या शहरात उघडणार आहे. त्या ब्रांच ओपनिंग साठी आम्ही काही जोडप्यांना या उद्घाटनासाठी बोलावलेला आहे. तुम्ही या उद्घाटनासाठी आला तर तुम्हाला आमच्याकडून गिफ्ट मिळणार आहे. अशा प्रकारचा आम्ही सुद्धा कोण वारंवार फोन करून लोकांना बारामती एमआयडीसी येथील हॉटेल सनलँड इथं बोलवून घेण्यात आलं, तिथे गेलेल्या अनेक जोडप्यांना आम्ही चांगल्या सहलींचे नियोजन करून देऊ असं सांगण्यात आलं. आणि सुवेनिअर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेल या कंपनीने लोकांना गंडा घातला. सध्या या कंपनीचे लोकं पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी चालू आहे.
यानंतर लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये मेंबरशिप देण्यात येते. ही मेंबरशिप देताना नागरिकांना त्यांनी दिलेल्या पैशाची बनावट रिसीट देण्यात येते. त्यानंतर त्यांना स्टॅम्प वरती करारही करून देण्यात येतो. मात्र या अगोदर झालेल्या अशा प्रकरणांमध्ये या कंपन्या कधीही नागरिकांना प्रतिसाद देत नाहीत. सहलीचे पॅकेज दिले आहे किंवा त्यांना सर्विस दिली आहे असे पुरावे दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक अनेक वेळा या कंपन्यांकडं आपले पैसे परत मागतात मात्र या कंपन्या नागरिकांना कोणताही प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी फसवणूक करून लोकांना सहलीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे हे प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत आहे.
बारामतीतही एमआयडीसीमध्ये हॉटेल सनलँड येथून बारामती इंदापूर माळशिरस दौंड तालुक्यातील नागरिकांना बोलावून घेतले होते. बारामतीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच बनावट ग्राहक पाठवून या कंपनीच्या लोकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आह. आता या प्रकरणांमध्ये पुढे या कंपनीने आतापर्यंत मुंबई छत्रपती संभाजी नगर लातूर धाराशिव कोल्हापूर पंढरपूर अशा अनेक ठिकाणी शेकडो नागरिकांना मेंबरशिप दिली आहे. आणि त्याच्यातील या किती लोकांना फसवलं आहे. आता या टोळीने आतापर्यंत किती लोकांना फसवलं आहे याचा पोलीस तपास करत आहे या कंपनीशिवाय अशा प्रकारच्या हॉलिडे कंपनीने जर कोणाची फसवणूक केली असेल तर बारामती तालुका पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.