BY:मच्छिन्द्र टिंगरे
काल सकाळी श्रीहरी नेहमी प्रमाणे शाळेसाठी घरातून सकाळी आठ वाजता बाहेर पडला. रस्त्यात नजर ठेवून असलेल्या गुन्हेगारांनी श्रीहरी ला उचलले. 10 च्या दरम्यान वडिलांच्या फोन ची रिंग वाजली. मुलगा सुखरूप पाहिजे असेल तर पाच कोटींची तयारी करा. पायाखालची जमीन सरकलेले वडील कृष्णा मूजमुले पाटील, राहणार जालना मूजमुले पाटील यांना पूर्वी मदत केलेले आयुष्यमान भारत मिशन चे महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कळवळी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेटे यांनी तात्काळ थेट फडणवीस यांना फोन लावला. अन सुरु झाला जालन्यात झालेल्या अपहरणाच्या सुटकेचा थरार.
देवेंद्रजी यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीस देखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP च्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांची पथके तयार करण्यात आली. घटनेला 2 तास उलटून झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज तपासून पोलिसांनी अपहरणकर्त्याचे ओळख पटवायला यश मिळाले. अपहरण झाल्या 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरण कर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू अशी धमकी देऊ लागले. छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलाने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचे ठरवलं गेले. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.
10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशाचा व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना रात्री आठ वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितल. पोलिसांनी रचलेल्या सापळ्या प्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले.त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्या आधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.
दोन्ही वेळीस फडणवीस देवदूत…
अपहरण झालेल्या मुलाची बहीण, कृष्णा मूजमुळे पाटील यांची मुलगी धनश्री कृष्णा मूजमुळे पाटील ह्या मुलीचे 7 वर्षा आधी ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आले. त्यावेळी सुद्धा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी, कृष्णा मूजमुळे पाटील कुटुंबीयांच्या मदतीला देव बनवून धावून आले. मुलीच्या सर्व ऑपरेशन खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून करण्यात आला होता. मुलगी धनश्री व मुलगा श्रीहरी या दोन्ही मुलांचा पुनर्जन्म झाला.. माझं, आणि दोन्ही वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवदूत बनून आले या शब्दात कुष्णा मुजमुळे यांनी पोलीस प्रशासन व देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.