BY : मच्छिंद्र टिंगरे – माळेगाव मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा सदस्य प्रमोद जाधव याने एका लहान मुलाला पुढे करून त्याच्याच मामाच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारीचा अर्ज लिहून घेऊन त्या मामाकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ठरलेल्या खंडणीच्या रकमेतून 25 हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना आज त्याला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद जाधव हा माळेगाव परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवत असून त्याच्या विरोधात अनेक लोकांच्या तक्रारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की त्याच्या घराच्या जवळच राहणार आहे अल्पवयीन मुलगा मामाच्या गावी सुट्टीला गेला होता. तो सुट्टी वरून परत आल्याच्या नंतर या मुलाला गोड बोलून त्याच्याकडून एक अर्ज लिहून घेऊन मामानी आपले सुट्टीला गेल्यानंतर आपले लैंगिक शोषण केले असल्याचा अर्ज लिहून घेतला होता.व तसेच त्याच्याकडून एक व्हिडिओ देखील तयार करून घेतला. तो व्हिडिओ तयार करून व तो अर्ज घेऊन त्या मामाला पुण्यातील कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या भाच्याचे लैंगिक शोषण केले असून हे प्रकरण मिटवायचं असल्यास चार ते पाच लाख रुपये द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी केली. घाबरलेल्या मामाने आपण अशा प्रकारचे कोणतेच कृत्य केले नाही तरी देखील आपल्याला लुटलं जात असल्याने बहिणीच्या घरी जाऊन या घटनेचा सोक्षमोक्ष केला. सविस्तर चर्चा केल्यानंतर त्या मुलाने माझ्याकडून त्या प्रमोद जाधव यांनी हे सर्व लिहून घेऊन मला असं बोलायला लावलं असल्याचे सांगितले.
याबाबत तक्रारदार अल्पवयीन मुलगा व त्याचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस स्टेशन च्या बाहेर असतानाच तेथे प्रमोद जाधव याचा फोन येत होता. तुम्ही लवकरात लवकर पैशाची तजवीज करा किंवा तुमचे विरोधात गुन्हा दाखल होईल अशी भीती घालत होता. सदर बाब फिर्यादीने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी पैसे देताना सापळा लावून 25 हजार रुपये खंडणी स्वीकारताना प्रमोद जाधव याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. प्रमोद जाधव यांच्या वरती आता बाललैंगिक शोषणाच्या पोस्को कायद्यांतर्गत व खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत.