BY : मच्छिन्द्र टिंगरे – विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सध्या सुरू आहे. यामध्ये आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईला बदली झाली आहे. तर पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल हे आता पुणे ग्रामीण पोलीस चे नवीन अधीक्षक असणार आहेत. संदीप सिंह गेल यांनी पुण्यातल्या कविता गॅंग आणि ट्रकच्या बाबतीत मोठ्या कारवाया केल्या होत्या या कारवाईबाबत त्यांचा पुणे शहर पोलीस दलामध्ये चांगलाच नावलौकिक आहे.
गृह विभागाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आज झालेल्या बदलांमध्ये प्रामुख्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई पोलीस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे. तर सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावरती कार्यरत असलेल्या तेजस्विनी सातपुते या पुणे पोलीस उपायुक्त म्हणून रुजू होणार आहेत. ग्राहक खात्याकडून पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बारामती विभागात मोठे फेरबदल… पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत बारामती पोलीस उपविभागामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गणेश बिराजदार हे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभागासाठी पदभार स्वीकारला आहे . तोपर्यंत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्यात विलास नाळे यांनी पदभार स्वीकारला असून, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारला आहे