BY :मच्छिन्द्र टिंगरे –
बारामती टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर कोण जाणार याची उत्कंठा शिगेला पोचली होती. अखेर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज त्यांनी राज्यसभेच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
बारामती लोकसभेचे इलेक्शन संपूर्ण देशात गाजले होते. सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर. लोकसभेच्या इलेक्शन नंतर देशातल्या राज्यसभेच्या काही जागा कार्यकाल संपल्यामुळे रिक्त झाल्या होत्या झाल्या होत्या. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून कोणाची वर्णी लागणार हा चर्चेचा विषय होता. यावरती शिक्कामोर्तब झाले असून आज सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ नरहरी झिरवळ तसेच बारामती नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता बारामतीला चक्क तीन खासदार मिळणार आहेत. सुनेत्रा पवार या राज्यसभेवर जात असल्याने बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.